मुंबई, १० जुलै | मुंबईचे पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यावरही CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे. तसेच राज्य सरकारच्या तपास यंत्रणा देखील त्यांना अटक करू शकण्याच्या शंकेने केंद्रीय तपास यंत्रणा देखील आधीच कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टीप्पणी केली आहे त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. पोलीस प्रशासन प्रमुख असलेले ते निर्दोष आहेत असा दावा करू शकत नाही. कारण तेदेखील यात समान जबाबदार आहेत. सचिन वाझेला १६ वर्षाच्या निलंबन कालावधीनंतर पुन्हा पोलीस सेवेत घेण्यावरून हायकोर्टाने हे विधान केले आहे. कोणताही प्रशासन प्रमुख केवळ सत्ताधाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत होतो हे सांगून स्वत: निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

प्रशासनाचा प्रमुखही तितकाच जबाबदार आहे. असंही असू शकतं की, मंत्र्याने सचिन वाझेल पुन्हा घेण्याचे आदेश दिले असावेत. परंतु उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याच्या कर्तव्याचे पालन न करता फक्त आदेशाचं पालन करू शकतो का? आम्हाला अपेक्षा आहे की, सीबीआय त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवेल. CBI या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यातील मुख्य दोषी कोण आहेत याचा शोध घेतील अशी आमची अपेक्षा आहे असं हायकोर्टाचे न्यायाधीश शिंदे यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai high court statement during hearing on Parambir Singh case allegations against Anil Deshmukh news updates.

मुंबई हायकोर्टाची टीप्पणी, पोलीस प्रशासन प्रमुखही तितकाच जबाबदार | परमबीर सिंग स्वतःच अडकणार?