9 October 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Parambir Singh | फरार परमबीर सिंग यांच्याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित बनावट सातबारा उतारे सुद्धा सरकारी कचेरीतून फरार

Parambit Singh

मुंबई, १३ ऑक्टोबर | फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेची एकेक प्रकरणं बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे. पुनमियाने सिन्नरमध्ये जमीन खरेदीसाठी (Parambir Singh) वापरलेला बनावट सातबारा उताराच आता सरकारी कचेरीतून गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाणी किती खोलवर मुरले आहे, ते समोर येत आहे.

Parambir Singh. Former Mumbai Police Commissioner Parambir Sinha, who is on the run, has come out with a shocking story about his anonymous assets. The fake Satbara Utara used by Punamiya to buy land in Sinnar has now disappeared from the government office :

मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय पुनमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे. मात्र, आता या जमीन खरेदीसाठी वापरलेला बनावट सातबारा रातोरात सरकारी कचेरीतून गायब करण्यात आला आहे. याबाबत दिव्या मराठीने मोठा खुलासा केल्याने फरार परमबीर सिंग यांच्या प्रमाणे त्यांचे बनावट सातबारा उतारे सुद्धा सरकारी कचेरीतून फरार झाले आहेत का अशी चर्चा रंगली आहे.

उतारा १ : सर्व्हे क्र. २०३/२४ अ, गाव उत्तन, ता. ठाणे
{२००७ साली सिन्नर तालुक्यातील धारणगाव येथे जमीन खरेदी करण्यासाठी संशयित आराेपी संजय पुनमिया याने वापरलेले वरील बनावट ७/१२ उतारे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन गावातील सर्व्हे क्र. २०३/२४ अ यावर स्वत:चे नाव टाकून पुनमियाने खरेदीखतासाेबत जाेडले हाेते. सदर ७/१२ उताऱ्यावरील मूळ मालक कयोमर्झ कावस पालिया यांचे नाव व्हाइट इंकने खाेडण्यात आल्याचा संशय आहे.

उतारा २ : सर्व्हे क्र. ५६१/१
मे. संध्या एंटरप्रायझेसतर्फे भागीदार संजय मिश्रीमल पुनमिया सदर उतारा : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट. (संदर्भ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज १० एप्रिल २००६)

उतारा ३ : सर्व्हे क्र. ७०/१
मे. लीना हाैसिंगचे भागीदार संजय मिश्रीमल पुनमिया { सदर उतारा : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट. (संदर्भ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज १४ ऑगस्ट २००७)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambit Singh fake transcript of Punmias land deal Satbara Utara missing from government file.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x