सरकारी कामात अडथळा | अर्णब गोस्वामींनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे

मुंबई, १७ डिसेंबर: अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. २०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
रायगड पोलिसांनी २ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध अलिबाग न्यायालयात १८०० पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.
तत्पूर्वी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor in Chief Arnab Goswami) आणि त्यांच्या पत्नीने सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेच्या कारवाईवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.
इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात (Interior Designer Anvay Naik suicide case) ४ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांनी अटक केली होती. अटकेच्या कारवाईवेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.
News English Summary: Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami and his wife have withdrawn their pre-arrest bail application filed in the Sessions Court. Police had registered an FIR against Naik for allegedly obstructing government work by beating up a female police officer during his arrest in the Naik suicide case.
News English Title: Republic TV Arnab Goswami takes back off pre arrest bail plea in alleged assault case on woman police officer news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC