मुंबई : आधीच वीजदरवाढीमुळे हैराण असलेल्या वीजग्राहकांवर आता नव्या पर्यावरण नियमांचा भार पडणार आहे. दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी आता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना नव्या सुसज्य यंत्रणा बसवाव्या लागणार आहेत. तसेच संबंधित प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या राखेच्या वाहतुकीचा बोजाही यंत्रणांवर पडणार असल्याने प्रति युनिट पन्नास ते साठ पैशांची वीजदरवाढ होणार आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण खात्याने कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी पर्यावरण रक्षणाचे नवीन सुद्धा नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या व खासगी अशा सर्व प्रकारच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक ठरणार आहे. परिणामी आता राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ, महानिर्मिती, अदानी यांसारख्या सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना त्यासाठी करावा लागणारा खर्च मिळावा, या मागणीसाठी केंद्रीय वीज नियामक आयोग आणि राज्य वीज नियामक आयोगाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे असे वृत्त आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		