16 December 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Mutual Fund Calculator | छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला 9 लाख रुपये मासिक परतावा हवा असल्यास हे फंडाचं गणित जाणून घ्या

mutual fund, investment, gain, profit

Mutual Fund Calculator | जर आपण म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 30 वर्षांसाठी एक ठराविक रक्कम गुंतवणूक केली, तर तुमच्या निवृत्तीपर्यंत सुमारे 12 कोटींचा निधी तुमच्याकडे जमा झालेला असेल. हो हे खरे आहे, तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही आज तुम्हाला छोटी गुंतवणूक करून दर महिन्याला नऊ लाख रूपये परतावा कसा मिळवायचा हे सांगणार आहोत.

म्युचुअल फंड गुंतवणुक खूप लोकप्रिय :
म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युचुअल फंड गुंतवणुकीचा प्रकार गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात छोट्या प्रमाणात, छोट्या रकमेपासून ही गुंतवणूक सुरू करू शकता. यावर आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज. म्हणजेच म्युच्युअल फंडावर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळते. मात्र, या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही दरवर्षी वाढवले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला आणखी आर्थिक बळ मिळेल.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर :
अर्थ तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही 30 वर्षे म्युच्युअल फंडात एसआयपी मध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवणूक कराल आणि त्यात वर्षानुवर्षे 10 टक्के वाढ करत गेलात, तर त्या कालावधीच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला सुमारे 12.7 कोटी रुपये मिळतील. जर तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीची माहिती नसेल, तर तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यात गुंतवणूक करा. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत ही म्युचुअल फंड गुंतवणूक जोखमीची आहे. यामध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याची शक्यता वाढते. या गुंतवणुकीअंतर्गत गुंतवणूकदारांना दरवर्षी 12 ते 17 टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळू शकतो. एकमात्र अट आहे की म्युच्युअल फंडाची निवड योग्य प्रकारे केली गेली आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर :
उदाहरणार्थ, जर एखादा गुंतवणूकदार 30 वर्षांसाठी मासिक एसआयपी मध्ये 10 हजार रुपये गुंतवत असेल तर ती गुंतवणूक दीर्घ कालावधी मध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने 15 टक्के परतावा देईल. दरवर्षी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढवत ठेवली तर, मग त्यावरील परतावाही वाढतो. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, गुंतवणूकदार 30 वर्षांनंतर सुमारे 12.70 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकतो.

पेंशन कॅल्क्युलेटर :
अंदाजानुसार, समजा जर तुम्हाला 12.70 कोटी रुपये परतावा मिळाला तर तुम्हाला दर महिन्याला 9 लाख रुपये मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund long term investment returns calculation on 28 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x