27 June 2022 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल
x

दिवाळी आधी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार | वडेट्टीवार यांची माहिती

Relief Package, Farmers, minister Vijay Wadettiwar

मुंबई, ०५, नोव्हेंबर: राज्यातील परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली.

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आमचं महाविकास आघाडी सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात लेखी पत्र देण्यात आलं आहे. अशा प्रकरणात अत्यावश्यक असलेली निवडणूक आयोगाची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल,” असं वडेट्टीवार म्हणाले.

तत्पूर्वी, राज्यातील शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अजून पोहोचलेलं नाही. परिणामी बळीराजा हवालदिल झाल्याचं ग्रामीण भागातील सध्या चित्र आहे. परतीच्या पावसात अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं प्रचंड नुकसान, जे बाधित शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत तसेच शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला उशीर यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

संबंधित पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. आताच्या अंदाजानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते अजून वाढत जाणार आहे. साधारणत: एकरी सहा क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी एक क्विंटल आणि फार कमी ठिकाणी दोन क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या जवळपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.”

 

News English Summary: The return rains in the state had caused a huge downpour. Due to heavy rains in many rural areas, farmers’ crops were severely damaged. The Mahavikas Aghadi government had announced to provide assistance to the farmers affected by heavy rains. Finally, a decision has been taken in this regard and before Diwali, the Maharashtra government has decided to help the farmers. State Minister for Relief and Rehabilitation Vijay Vadettiwar informed the media about this.

News English Title: Relief Package will soon get to farmers said minister Vijay Wadettiwar News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x