15 December 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bigg Boss Marathi | बिग बॉस फेम 'अरबाज पटेलने' सांगितलं छत्रपती शिवरायांचा जयजयकार न करण्यामागचं कारण - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • अरबाजने सांगितलं हे कारण :
  • सध्या काय सुरू आहे बिबींच्या घरात :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बिग बॉस मराठीची चर्चा होताना पाहायला मिळतेय. अगदी पहिल्या आठवड्यापासून एका मागोमाग अनेक सदस्य कुठेतरी खेळामध्ये कमी पडल्यामुळे घराबाहेर पडले. मागील आठवड्यात बॉडी बिल्डर संग्राम आणि अरबाज पटेल या दोघांना घराचा निरोप घ्यावा लागला.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा पहिला वहिला सदस्य म्हणजे पुरुषोत्तम दादा. ज्यावेळी पुरुषोत्तम दादा बाहेर पडले त्यावेळी त्यांनी विठू माऊलीचं नामस्मरण करत हात जोडून पांडुरंगा चरणी स्वतःची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील जयजयकार केला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य पायातील चप्पल काढून आणि हात जोडून पुरुषोत्तम दादा मागे देवांचं नामस्मरण करत होते. यावेळी अरबाज हाताची घडी घालून गप्पचूप उभा होता.

त्यानंतर प्रेक्षकांकडून अरबाजला प्रचंड प्रमाणात टोल करण्यातही आलं होतं. सध्या अरबाज घराबाहेर पडला असून तो ठीक-ठिकाणी इंटरव्यूसाठी जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या घेतलेल्या मुलाखतीत अरबाजने छत्रपती शिवरायांची घोषणा का केली नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय म्हणाला अरबाज पाहुया

अरबाजने सांगितलं हे कारण :

अरबाजला एका वृत्तवाहिनीच्या इंटरव्यू दरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. सर्वातआधी त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की,’तू बरा आहेस का, यावर अरबाज म्हणाला ,’नाही मी खूप दुःखी आहे’. परंतु तो असं मस्करीत म्हणाला. पुढे इंटरव्यूमध्ये अरबाजला तू पुरुषोत्तम दादांबरोबर महाराजांच्या जयजयकार केला नाही त्याबद्दल काय सांगशील अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अरबाज म्हणाला की,’मला ना माहीतच नव्हतं तिथे काय चाललं होतं. कारण की कधी कधी आपल्या मनात खूप विचार चालू असतात. जर मी काही वाईट रिएक्शन दिलं असतं आणि वाकडं तिकडं तोंड केलं असतं तर, तुम्हाला कळालं असतं की काहीतरी आहे याच्या मनामध्ये’.

पुढे अरबाज म्हणतो की,’ फर्स्ट नॉमिनेशन होतं आणि मी खूप इमोशनल आहे आणि मी त्यांना नॉमिनेट केलं होतं आणि ते जात होते. मी काहीतरी विचार करत होतो. मी ऐकलेही नाही ते काय म्हणत होते’.

अशा पद्धतीचं स्पष्टीकरण अरबाजने दिल. परंतु, समस्त प्रेक्षकांची मने दुखवली गेली म्हणून त्याने लगेच माफी देखील मागितली. पुढे अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे तो सुद्धा संभाजीनगरचाच आहे आणि त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी रिस्पेक्ट आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य अरबाजने केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

सध्या काय सुरू आहे बिबींच्या घरात :

सध्या बिग बॉसच्या घरात 8 सदस्य उरले आहेत. यामधून चालू आठवड्यात कोण घराबाहेर जाणार त्याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर बिग बॉसचा आजचा भाग पाहणे खरोखरच रंजक ठरणार आहे. कारण की आजच्या भागात टास्कचा महाबाप बिग बॉस यांनी घरातील सदस्यांसमोर आणून ठेवला आहे. आता पुढे टास्क कसा खेळला जाणार, त्याचबरोबर या टास्कचे कोणकोणते नियम असतील त्या सर्व गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x