12 December 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

साताऱ्याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद | पळपुट्या गद्दारांवर करोडो खर्च करणाऱ्यांवर किरण मानेंची पोस्ट

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही. मात्र, शिंदे यांनी शाहू महाराज यांचं ट्वीट केलेल्या पोस्टरमध्ये अजूनही एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा उल्लेख आहे. एवढंच नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली याचाही उल्लेख आहे. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये या आमदारांवर प्रतिदिन करोडो रुपये खर्च केले जात आहेत. अशातच सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर सर्वजण प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, अभिनेते किरण माने यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सातार्‍याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद :
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ‘न्यूज चॅनलवाल्या माझ्या मित्रांनो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला मालकाचे आदेश असतात. पण आता लै बील झालं. पळपुट्या गद्दारांना आणि त्यांच्यावर करोडो रूपये खर्च करणार्‍या फडतूसांना हिरो करणारे मोठेमोठे अर्ध्या तासांचे खोटे कार्यक्रम दाखवणं बंद करा… आमच्या सातार्‍याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद झालाय. जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये आपल्या आर्मीचं ‘ऑपरेशन रक्षक’ सुरू असताना, जवान सुरज शेळके याला वीरमरण आलं आहे’ असे म्हटले आहे.

त्याच्यावर एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दाखवा :
पुढे त्यांनी म्हटले की, ‘फक्त २३ वर्ष वय असलेल्या माणदेशी मातीतल्या, खटावच्या सुपुत्रानं देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्यात. त्याच्यावर एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दाखवा. त्याच्या मित्रांच्या, गांवातल्या लोकांच्या मुलाखती दाखवा. देशासाठी जीव ओवाळून टाकणार्‍यांची खरी ‘पॅशन’ दाखवा… लोकांना कळूद्या ‘खरे हिरो’ कसे असतात ते… सुरज, तुला कडकडीत सलाम ! जयहिंद.’

Kiran-Mane

सूरज शेळके हा २३ वर्षीय जवान शहीद :
साताऱ्याच्या खटाव येथे राहणारा सूरज शेळके हा २३ वर्षीय जवान शहीद झाल्याने खटावमध्ये दुखाचे वातावरण आहे. सूरज शेळके आपल्या प्रशिक्षणानंतर अवघ्या तीन वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पहिली पोस्टींग लेह लडाखमध्ये झाली होती. २३ वर्षाच्या वयात देशासाठी परमोच्च सेवा सूरज शेळके यांनी दिली आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी या जवानाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel and Kiran Mare social media post check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x