13 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Love and War Movie | 'लव्ह अँड वॉर' ला धडकणार किंग खानचा 'किंग', चित्रपटात झळकणार लग्नाच्या 'या' जोड्या

Highlights:

  • Love and War Movie
  • लव्ह अँड वॉर
  • शाहरुखचा आगामी सिनेमा देणार लव्ह अँड वॉरला टक्कर
Love and War Movie

Love and War Movie | रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या आयुष्यात असणाऱ्या पती-पत्नीच्या जोड्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. अभिनेता रणबिर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट सोबतच लाखो दिलांची धडकन कटरीना कैफ आणि विकी कौशल हे चौघेजण लव अँड वॉर या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली असून, अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या ‘किंग’ चित्रपटाने लव्ह अँड वॉरला टक्कर देणार की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची माहिती माध्यमांकडून समजतेय. विशेष म्हणजे ईदच्या दिवशी हे दोन चित्रपट सिनेमागृहात एन्ट्री करणार आहेत.

लव्ह अँड वॉर
आलिया भट, रणबिर कपूर, विकी कौशल आणि कटरीना या चौघांचा लव अँड वॉर हा आगामी चित्रपट 20 मार्च 2026 साली प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन अनेक महिने झाले आहे. चित्रपट रिलीज डेट अतिशय लांबणीवर पोहोचली आहे. दरम्यान या चित्रपटाचे चित्रीकरण ‘संजय लीला भन्साली’ यांचे असून त्यांनी आत्तापर्यंत सिनेसृष्टीला दिग्गज कलरकारांना सोबत घेऊन एकशेएक चित्रपट दिले आहेत. संजय लीला भन्साली सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतात. दरम्यान त्यांचा लव अँड वॉर पाहण्यासाठी प्रेक्षकांना जास्त प्रमाणात वाट पहावी लागणार आहे.

शाहरुखचा आगामी सिनेमा देणार लव्ह अँड वॉरला टक्कर
अभिनेत्री आलिया भट, रणवीर कपूर आणि विकी कौशल या तिघांचं त्रिकूट पहिल्यांदाच सोबतीने झळकणार आहे. याआधी रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये सोबत पाहायला मिळाले. त्यानंतर ‘संजू’ या चित्रपटामध्ये रणबीर आणि विकी कौशलची घट्ट मैत्री पहायला मिळाली. परंतु हे तिघे पहिल्यांदाच लव अँड वॉरच्या निमित्ताने एकत्र येऊन काम करताना पाहायला मिळणार आहेत.

फक्त रिलीज डेट समोर येऊन आणि 20 मार्च 2026 ला शाहरुख खानचा ‘किंग’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये धडक द्यायला येणार असून दोन्हीही चित्रपटांबाबत कोणतीही मोठी अपडेट समोर आली नाहीये. अनेकजण शाहरुखच्या किंग या चित्रपटाविषयी जाणून घ्यायला उत्सुक आहेत.

Latest Marathi News | Love and War Movie Release Date Announced 14 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Love and War Movie(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x