1 May 2025 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

#KisiKaBhaiKisiKiJaan | बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट येतोय, पहिला लूक व्हिडीओ पोस्ट केला

KisiKaBhaiKisiKiJaan

#KisiKaBhaiKisiKiJaan | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. लवकरच सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, भाईजानने चित्रपटामधील पहिला लूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या व्हिडीओला टॅग केले आहे.

सलमानचे इंडस्ट्रीमध्ये 34 वर्ष पुर्ण :
सर्वांचा आवडता सलमान खानला गेल्या 26 ऑगस्ट रोजी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 34 वर्ष पुर्ण झाले आहेत. सलमानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आणि याचाच आनंद चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटामधील सलमानचा लुक तुम्ही 59 मिनीटाच्या व्हिडीओमध्ये बघू शकता. व्हिडीओमध्ये तुम्हाला सलमान वाळवंटासारख्या निर्जन भागामध्ये स्पोर्ट्स बाईकवर दिसून येत आहे. तर मोकळे रुंद केस, ग्लासेस आणि त्याचे सिग्नेचर ब्रेसलेटची झलक यावेळी दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाचे टायटल कंफर्म :
चित्रपटामधील सलमानने त्याची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या पर्सनल अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहीले आहे की, #KisiKaBhaiKisikiJaan. दरम्यान, सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसने सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहीले आहे की, आत्ता तर फक्त सुरुवात आहे. सलमानने स्वत: टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा केली आहे. सुपरस्टार सलमान सध्या पुजा हेगडे सोबत चित्रपटाचे शुटींग पुर्ण करत होता.

‘किसी का भाई किसी की जान’ अॅक्शन चित्रपट
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. दरम्यान या चित्रपटामध्ये सुपरस्टार भाईजान सोबत पुजा हेगडे आणि व्यंकटेश मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. चाहत्यांसाठी आणखी एक थ्रिल असणार आहे. बीग बॉस चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये असा एक आवडीचा चेहरा दिसून येणार आहे ज्याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल. बीग बॉस 13 मधील शहनाज गिल सुद्धा या चित्रपटामध्ये सलमान खान सोबत झळकणार आहे. हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली बनला आहे. सलमानचा हा चित्रपट 2022 च्या आखेरीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan movie is coming soon Checks details 6 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

KisiKaBhaiKisiKiJaan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या