3 May 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Jawan Movie Video | किंग खान चेन्नईमध्ये 200 महिलांसोबत करणार 'जवान' चित्रपटाचा मेगा-अ‍ॅक्शन शूट, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Shah Rukh Khan

Jawan Movie| बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच रिलीज झालेला आलिया भट्ट आणि रणबीर करूरचा ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये शाहरूख खानचा कॅमिओ दिसून आला होता. दरम्यान, चाहते किंग खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शुटींग सुद्धा सुरु करण्यात आले आहे. तसेच या आठवड्यामध्ये शाहरुख चि६पटाच्या शुटींगसाठी चेन्नईला जाणार आहे जिथे तो जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करणार आहे.

शुटींगसाठी मोठा सेट उभा केला
दरम्यान, माध्यमांवर विश्वास ठेवला तर शाहरुख खानच्या आगामी चित्रपटामधील एका मेगा-अॅक्शन सीनच्या शुटींगसाठी मोठा सेट उभा करण्यात आला आहे. असेही सांगितले जात आहे की, शाहरूख हा सीन 200 महिलांसोबत करणार आहे. अशी चर्चा रंगत आहे की, ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक ऍटली यांनी मुंबईमध्ये सुमारे 200 ते 250 ‘महिला व्यवस्थापन अधिकारी’ क्राउडसोर्स केले आहेत आणि ज्याचे शूटिंगसाठी चेन्नईला होणार आहेत. हा मेगा-अॅक्शन सीन सात दिवसांमध्ये पुर्ण करायचा असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेलर रिलीज झाला
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यामध्ये शाहरूख खान, जखमी अवस्थेमध्ये दिसून येत आहे तर त्याच्या चेहऱ्यावर पट्टी केल्याचे दिसते. यामधील शाहरुख खानचा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी दिग्दर्शक ऍटली म्हणतात की, हा माझ्यासाठीही एक अद्भुत अनुभव होता, कारण मला अॅक्शन चित्रपट खूप आवडतात! टीझर फक्त आगामी चित्रपटाची झलक देतो.

2 जून 2023 मध्ये होणार ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित
‘जवान’ चित्रपटामध्ये किंग खान महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीही या चित्रपटात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवान चित्रपटाची निर्मीती गौरी खानने केली असून दिग्दर्शन अॅटली यांनी केले. दरम्यानस हा आगामी चित्रपट 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखचे आगामी चित्रपट
‘जवान’ चित्रपटासह शाहरुख खान ‘पठाण’ आणि ‘डंकी’मध्येही झळकणार आहे. दरम्यान, पठान चित्रपटामध्ये शाहरूख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. तर ‘डंकी’ चित्रपटाममध्ये शाहरुख खान सोबत तापसी पन्नूसोबत दिसून येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत शाहरुख ‘टायगर 3’मध्येही अॅक्शन सीनमध्ये दिसणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shah Rukh Khan will start shooting for Jawan in Chennai Checks details 18 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shah Rukh Khan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या