12 December 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

....अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं - जितेंद्र जोशी

Marathi Film Actor Jitendra Joshi, tweet over Actors trolling

मुंबई: सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं त्याने म्हटलंय.

तत्पूर्वी, मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून काही मराठी कलाकारांनी व्यक्त होताना समाज माध्यमांवर संतप्त भावना व्यक्त करत मराठी बद्दलची भावना बोलून दाखवली होती. त्यात सोनाली कुलकर्णीने ट्विट करताना म्हटलं होतं, “मुंबई ची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा म्हणजे…..“मराठी”…..ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा” असं ट्विट केलं होतं.

मात्र त्यानंतर देखील अनेक नेटिझन्सनी सोनाली कुलकर्णी तसेच इतर मराठी कलाकारांना धारेवर धरून प्रतिप्रश्न केले. तसेच इतर मराठी कलाकार का व्यक्त झाले नाहीत असे प्रश्न देखील त्यांनाच विचारले. त्यानंतर सोनाली चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. सोनालीने पुन्हा संतप्त भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, ” ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं.
कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच…..कलाकार व्यक्त होत नाही म्हणून…..आणि मग व्यक्त झाले तरीही ट्रोलिंग हे सुरूच राहतं.

 

News English Summery: Social media is the most widely used medium for celebrities to reach the public. Social media has reduced the gap between celebrities and fans. However, trolling has also increased. Marathi Film Actor Jitendra Joshi has expressed his anger over the trolling. Either this media should be released or the trolling should be expressed without begging, he said. Marathi Film Actress Sonali Kulkarni tweeted a tweet from the artist’s trolling. ‘Twitter now lets any artist share their opinions, opinions, feelings, etc. We should stop expecting it to be expressed on social media. Because we will not be able to respect those opinions. As the artist is not expressing and then expressed, trolling continues, ‘she wrote in her tweet.

 

Web News Title: Story Marathi Film Actor Jitendra Joshi tweet over Actors trolling.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x