12 December 2024 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड

Stree 2 Movie

Stree 2 Movie | श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा चित्रपट स्त्री टू बॉक्स ऑफिसवर धमाल कमाई करत आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाला देखील मागे टाकलं आहे. जबरदस्त कॉमेडी आणि हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत जोरदार कमाई केली आहे. चला तर मग गेल्या दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊ.

मॅडॉक फिल्मने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्त्री टूच्या वर्ल्डवाईड कलेक्शनची माहिती दिली आहे. यावर दिलेल्या माहितीनुसार, स्त्री 2 चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 505 कोटी रुपये इतकं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर भारतात स्त्री 2 ने 426 कोटींची कमाई केली आहे. शनिवारी या चित्रपटाचा दहावा दिवस आहे. 10 व्या दिवशी स्त्री 2 ने 38 कोटी रुपयांचा बिजनेस केला आहे.

शाहरुख खानचा डंकीला टाकलं मागे
श्रद्धा आणि राजकुमार रावच्या स्त्री 2 चित्रपटाने शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा बोलबाला होता. डंकीने त्यावेळी वर्ल्डवाईड 470 कोटी रुपयांचा बीजनेस केला होता.

तर यावर्षी स्त्री 2 ने तब्बल 505 कोटी रुपयांचा बिजनेस केला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्याही चित्रपटाने हा रेकॉर्ड बनवलेला नाही. श्रद्धा आणि राजकुमार रावच्या या चित्रपटाचं साऱ्यांनीच कौतुक केलंय. तसेच चहाते चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत.

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट
स्त्री 2 हा चित्रपट 2018 मध्ये आलेल्या स्त्री या चित्रपटाचा सिक्वल आहे. स्त्री चित्रपटाने देखील त्यावेळी जबरदस्त कमाई केली होती. अमर कौशिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. स्त्री 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अमर कौशिक यांनी केला आहे. 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात जबरदस्त स्टारकास्ट असून यामध्ये अक्षय कुमार आणि वरून धवन या दोघांचे देखील एंट्री आहे.

News Title : Stree 2 Movie Box Office Collection 31 August 2024.

हॅशटॅग्स

#stree 2 movie(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x