5 June 2023 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Video Viral | 'AU' म्हणजे रिया चक्रवर्तीची मैत्रीण 'अनाया उदास', महाराष्ट्राचं राजकारण ऐतिहासिक किळसवाण्या दिशेने

Video Viral

Video Viral | भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

संजना घाडी यांनी व्हिडिओ ट्विट केला :
संजना घाडी यांनी ट्विट केलेल्या त्या व्हिडिओत रिया चक्रवर्तीला विचारण्यात आलंय की, मुंबई पोलिसांवर या प्रकरणी काही राजकीय दबाव आहे का? AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे का? उत्तर देताना रिया चक्रवर्ती म्हणतेय, माझी एक मैत्रीण आहे अनया उदास. तिचे नाव AU नावाने सेव्हा आहे. पण लोकांनी त्याचा आदित्य उद्धव..असा अर्थ घेतलाय.

पुढे स्पष्टीकरण देताना रिया म्हणाली होती की, ‘असं असताना पुन्हा पुन्हा याच्याशी आदित्य ठाकरेंशी संबंध जोडला जातोय… मी आजपर्यंत आदित्य ठाकरेंशी भेटलेले नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही.. मला प्रोटेक्ट करण्यासाठी राजकीय दबाव आणला जातोय, असं म्हटलं जातंय. मात्र तसं काहीही नाही, मला उलट प्रोटेक्शनची गरज आहे, असं उत्तर रिया चक्रवर्तीने दिलं आहे.

दिशाचा मृत्यू – सीबीआयचा निष्कर्ष
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली होती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला होता.

शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात आणि आगामी मुंबई महानगपालिका निवडणूका
त्यामुळे सध्या शिंदे गटाच्या खासदाराने संसदेत उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरले गेल्याने खळबळ माजवण्याच्या हेतूने हे आरोप केले गेल्याचं म्हटलं जातंय. मात्र यातून राजकीय दृष्ट्या शिंदे गट बावचळल्याचं म्हटलं जातंय. तसेच आगामी मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी हे प्रकरण तापवलं आणि लांबवलं जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Actress Rhea Chakraborty on her friend name Ananya Udhas check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x