Beauty Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर आणि तरुण दिसावे असे वाटत असते. यासाठी अनेक जण विविध क्रिम चेह-यावर लावतात. मात्र याचा वापर जास्त केल्याने चेहरा खराब होतो. अनेक युवकांध्ये केस पांढरे होणे, त्वचा निस्तेज होणे, डोळ्यांना काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या येणे या समस्या दिसतात. यासाठी प्रदूशन हे कारण तर आहेच मात्र या व्यतीरिक्त अनेक छोट्या छोट्या चुका देखील कारणीभूत आहेत.
आपल्या केसांची आणि त्वचेची निट काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच रोजच्या आपल्याकडून घडत असलेल्या शुल्लक चुका टाळणेही गरजेचे आहे. त्यामुळे आज या बातमीतून चेहरा आणि केस सुंदर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणी कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घेऊ.
चेहरा धुतल्यावर अनेक जण तो टॉवेलने पटापट पुसून घेतात. मात्र जेव्हा आपण चेहरा धुतो तेव्हा तो मउ कापडाने टॅपटॅप करत पुसायचा असतो. मात्र टॉवेलचा वापर केल्याने त्वचा खराब होते. खेचली जाते आणि सुरकुत्या येतात.
झोपण्याची पध्दत देखील याला कारण असू शकते. जर तुम्ही एका अंगावर ४ ते ५ तास झोपाल तर तुमच्या चेह-यावर दाब येतो त्याने देखील सुरकुत्या येतात.
जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा वाहनांचा धूर, धुळ, माती या पासून स्वताचा बचाव केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही चेह-याला एखादे स्कार्फ किंवा सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे.
चेह-यावर सतत हात ठेवू नये. सारखे चेह-याला स्पर्श करु नये. आपण काम करत असताना आपल्या हाताला बरिच धूळ लागलेली असते मात्र ती आपल्याला जाणवत नाही. अशात सारखा चेह-याला हात लावला तर तो खराब होतो. यात अनेकांना पिंपल्स देखील येतात.
आपल्या शरिरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने देखील सुरकुत्या येतात. तसेच व्हिटॅमीन सी कमी झाल्यवर देखील हा त्रास जाणवतो. त्यासाठी रोज ८ ते ९ ग्लास पाणी पिले पाहिजे आणि संत्री, मोसंबी, किवी ही फळे खाल्ली पाहीजेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Beauty Tips Follow these tips to look beautiful 04 November 2022.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		