27 November 2022 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Makeup Mistakes | या मेकअप चुकांमुळे तुम्ही वयस्कर दिसू शकता, तरुण दिसण्यासाठी या मेकअप फॉलो करा

Eye Makeup Mistakes

Eye Makeup Mistakes | मेकअप करण्यासाठी महिलांना वेळ काळ लागत नाही. त्या कधीही मेकअप करू शकतात. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना किंवा स्वतःला सुंदर आणि अद्वितीय दिसण्यासाठी महिला मेकअपचा वापर करताना दिसून येतात. मेकअप केल्यामुळे तुमची त्वचा चमकते आणि आत्मविश्वासामध्येही भर पडते. मेकअपमुळे तुम्हाला हवा तसा लुक मिळू शकतो असे म्हटले तर वावगे नाही. मेकअप मधील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचा मेकअप, डोळ्यांच्या मेकअप वर तुमचा सर्व लुक अवलंबून असतो. तुम्ही डोळ्यांचा मेकअप जितका चांगला कराल तितकेच तुम्ही चांगले दिसाल यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र तुम्ही डोळ्यांचा मेकअप जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्ही लवकर वयस्कर दिसायला लागता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा मेकअप चुकणार नाही आणि तुम्ही तरूण दिसाल.

जास्त मस्करा वापरू नका
मेकअप करताना आपण पापण्या काळ्या, लांब आणि जाड दिसण्यासाठी मस्करा वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का की त्याचा अतिवापर केल्याने डोळ्यांखाली सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. ज्यामुळे तुम्ही वयाच्या आधी म्हातारे दिसायला लागता. त्याच वेळी, नैसर्गिक दिसण्याऐवजी, पापण्या बनावट दिसू लागतात आणि जर तुम्ही मस्करा जास्त वापरत असाल तर तुमच्या पापण्याही पडू लागतील. त्यामुळे मस्करा जास्त वापर न करण्याचा प्रयत्न करावा.

आयब्रो पेन्सिल कमी वापरा
आपण कायम भुवया दाट दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिलचा वापर करतो मात्र त्याचा जास्त वापर केल्याने भुवयांचे केस गळण्यास सुरुवात होते आणि यामुळे तुम्ही वयापेक्षा मोठेही दिसू शकता.

आय लाइनर कमी वापरा
कोणाकोणाचे डोळे लहान असतात आणि अश्यावेळी आपण डोळे मोठे दिसण्यासाठी भरपूर आयलायनर लावतो, पण यामुळे डोळ्यांच्या खाली जास्त लायनर वापरल्याने तुमचे डोळेही छोटे दिसू लागती. त्याऐवजी, तुम्ही हलकी मेकअप पेन्सिल वापर ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना परफेक्ट लुक येईल.

आयशॅडो कशी लावायची
दरम्यान, आपले डोळे आयशॅडोच्या मेकअप मुळे सुंदर दिसतात. पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून तुम्ही म्हातारे दिसू शकता. आयशॅडो लावताना हे लक्षात ठेवावे की ते सर्व पापणीवर लावावे लागणार नाही कारण पापण्यांवर आयशॅडो लावल्यास या पद्धतीमुळे तुम्ही म्हातारे दिसण्यास सुरुवात होते. तसेच, हलक्या रंगाच्या आयशॅडोचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आयशॅडो वापरताना हे लक्षात ठेवा की फक्त डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यांवर त्याचा वापर करावा आणि यामुळे तुमचा लूक देखील वाढेल.

इतर टिपा
तुम्ही फक्त ब्रँडेड आय मेकअप वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला लवकर वृद्धत्व येणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eye Makeup Mistakes fashion tips checks details 24 September 2022.

हॅशटॅग्स

Eye Makeup(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x