15 December 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Shani Vakri | 23 ऑक्टोबरपर्यंत या राशींसाठी शनी अत्यंत लाभदायक आहे | मोठे शुभं परिणाम दिसणार

Shani Vakri till

Shani Vakri | शनी रविवार ५ जून २०२२ पासून वक्री अवस्थेत आला आहे. शनीची वक्रदृष्टी अर्थात उलटी हालचाल अनेक राशींसाठी त्रासदायक ठरते. शनी केवळ प्रत्येक जातकालाच दुखावत असले, तरी त्यांचा एक अत्यंत फलदायी आशीर्वाद सुद्धा मिळतो. जर शनी देवांचा शुभ आशीर्वाद मिळाला तर अनेकांचं नशीब पालटतं असं शास्त्र सांगतं. त्यामुळेच शनीची वक्री अवस्था अनेक राशींसाठी लाभदायक ठरेल. जाणून घ्या शनीच्या कोणत्या राशीचा लाभ होईल.

मेष राशी :
शनीची उलटी चाल मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. ५ जून ते २३ ऑक्टोबर या काळात शनी याच अवस्थेत राहील. अशात तुम्हाला नोकरीत नव्या संधी मिळू शकतात. या काळात तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होऊ शकते.

कर्क राशी :
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची उलटी चाल अत्यंत शुभ राहणार आहे. या काळात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित करता येतात. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. व्यवसायात लाभाचे योग येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

सिंह राशी :
सिंह राशीच्या लोकांसाठी वक्राकार चालीचा प्रभाव संमिश्र असू शकतो. या काळात तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, पण केलेल्या मेहनतीत तुम्हाला यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अडकलेले काम पूर्ण होईल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारापासून मुक्ती मिळू शकते.

मकर राशी :
मकर राशीच्या व्यक्तींना वक्री शनीच्या काळात सुखसोयींचा लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. नोकरीत बढती मिळू शकते. धन लाभाचे योग बनतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन राशी :
मीन राशीच्या व्यक्तींना वक्री शनीच्या काळात धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये बदल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. व्यापार सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. कार्यक्षेत्रात प्रगती संभवते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shani Vakri till 23 October check details 06 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x