2 May 2025 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा

benefits of jackfruit

मुंबई ९ एप्रिल : फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे जर तुम्ही फणस खात नसाल किंवा कमी खात असाल, तर तुम्ही चुकी करताय. जीवनसत्त्वांनी युक्त असं हे फळ तुम्ही शक्य तितक खायला हवं . आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ

१. फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमीन ए, सी, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह यांचा फणसात मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

२. पिकलेल्या फणसाचा पल्प करुन तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.

३. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

४. भरपूर प्रमाणात लोह असल्याने ऍनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

५. थायरॉइडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

News English Summary: Very few people know that jackfruit is healthy. So we have fennel eaten only for taste and appetite, but in fact jackfruit is rich in Vitamin A, Vitamin B-6 and Vitamin C. Vitamin A is very beneficial for your eyes. Vitamin B6 is a nutrient for brain development and Vitamin C plays an important role in boosting the immune system. So if you don’t eat jackfruit or eat less, you are wrong. You should eat as much of this vitamin-rich fruit as possible. Today we will learn some of the healing properties of this fruit

News English Title: Eat jackfruit and get vitamins and be healthy news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या