2 May 2025 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health First | मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Benefits of cooking in clay pots

मुंबई, ३० जून | काळ बदलला आणि मनुष्याच्या राहणीमानात, सवयींमध्ये अनेक मोठे बदल झाले. हे बदल फक्त राहणीमानापुरतेच मर्यादित नव्हते तर, माणसाची संपूर्ण जीवनशैलीच काळाने बदलवली. मग याला गृहिणींचे स्वयंपाकघर कसे अपवाद ठरेल? किचनमध्ये देखील काळानुसार नवनवीन स्वयंपाकाची भांडी आली आणि जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवण्यासाठी सज्ज झाली आहेत.

आजच्या नॉनस्टिकच्या काळात आपल्या पारंपरिक मातीच्या भांडयांना मिळणारी पसंती खूप चांगली आणि सुखावणारी आहे. स्वयंपाकघर आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत याच मातीच्या भांड्यांचे आरोग्यदायी फायदे.

अन्न उत्तम शिजते:
चांगल्या आरोग्यासाठी जेवण बनवताना ते हळू हळू शिजले पाहिजे. मातीच्या भांड्यात अन्न शिजताना ते हळूहळू शिजत असल्याने अन्नाची पौष्टिकता राखली जाऊन ते आपल्या शरीरास फायदेशीर ठरते.

पोषक द्रव्ये:
मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळत असल्याने आपले शरीर देखील सुदृढ राहते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नातून कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात मिळते.

तेल कमी:
मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना तेल हे नॉनस्टिकपेक्षा कमी लागते. त्यामुळे अतिशय कमी तेलात आपला स्वयंपाक होतो. शिवाय या अन्नामुळे शरीरातील आम्लपित्ताची पातळी देखील राखली जाते.

बद्धकोष्ठतेपासून सुटका:
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.

अधिक रुचकर आणि चविष्ट:
मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना त्यात त्या भांड्यांचा एक वास आणि चव उतरत असल्याने अन्न अधिक रुचकर होते.

वाजवी किंमत आणि भरपूर पर्याय:
अॅल्युमिनियम, नॉनस्टिक आणि इतर सर्व भांड्यांच्या तुलनेत मातीची भांडी रास्त दारात उपलब्ध होतात. सोबतच मातीच्या भांड्यांमध्ये कुकर, तवा, कढई पासून पाण्याच्या बाटल्या, हंडी आदी अनेक भांडी मिळतात.

पर्यावरण पूरक:
मातीची भांडी वापरल्यामुळे निसर्गाला कोणतीच हानी पोहचत नाही. शिवाय या भांड्यांची विल्हेवाट लावणे देखील अतिशय सोपे आणि पर्यावरण पूरक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of cooking in clay pots news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या