मुंबई, ०२ ऑगस्ट | मासिकपाळी अनियमित सुरु झाली की बऱ्याचदा डॉक्टर्स PCOD (Polycystic Ovarian Disease) या बद्दल बोलू लागतात. अगोदर या आजाराची ओळख करून घेतली पाहिजे. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.
तरुणींमध्ये आजकाल हा आजार सर्रास पहिला जातो. या आजारामुळे वजन वाढणे, गर्भधारणामध्ये दोष निर्माण होणे अशा अनेक समस्या आढळतात. या समस्येमागे शरीरात हार्मोनल असंतुलन कारणीभूत असते. तसेच जीवनशैलीत बदल यामुळे सीवुद्धा त्रास होऊ शकतो. जर पीसीओडी मुळे गर्भ राहण्यास समस्या होत असेल तर डॉक्टर्स सुरुवातीला वजन आटोक्यात करण्यास सांगतात.
पीसीओडीची अनेक लक्षणे आहेत जसे की अति लठ्ठ महिला, अनुवंशिकता, अनियमित जीवनपद्धती, जास्त प्रमाणात जंक फूड खाणे, केस गळणे, चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे इत्यादी.
ह्या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित व्यायाम हे सांगितलं जातं . डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित हार्मोन्सच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. या आजारावर उपाय म्हणून फक्त नैसर्गिक उपाय करणे नसून योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Polycystic ovarian disease related to females details in Marathi news updates.
