2 May 2025 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

२०१४ मधील मोदींच ते ट्विट | आपलं ते 'जनआंदोलन' | इतर आंदोलक 'आंदोलनजीवी'?

2014 loksabha Elections, Jan Andolan, Narendra Modi

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही. एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं.

मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो.

दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून विरोधकांना घेरताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आंदोलनजीवी” या नव्या जमातीचा शोध लावला. विशेष म्हणजे या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात असं विधान देखील त्यांनी केलं. मात्र इतरांच्या आंदोलनावर शंका घेणाऱ्या मोदींनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एक ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘२०१४ मधील निवडणूक ‘जनआंदोलन’ असेल. स्वतःच्या निवडणूक तंत्राला “जनआंदोलन” संबोधणारे मोदी आज इतरांच्या आंदोलनाला “आंदोलनजीवी” संबोधत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

 

News English Summary: Meanwhile, Prime Minister Narendra Modi discovered a new tribe called “Andolanjivi” while surrounding the opposition with the farmers’ movement. He also said that we should be careful of these agitators, they are all parasites. However, Modi, who had doubts about the agitation of others, had tweeted in the 2014 Lok Sabha elections. He had said that the 2014 elections will be a ‘people’s movement’. It is worth mentioning that Modi, who calls his own electoral system a “people’s movement”, is today calling the movement of others “agitators”.

News English Title: 2014 loksabha Elections will be Jan Andolan said Narendra Modi in Ranchi rally news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या