1 May 2025 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

भारत बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात एल्गार

मुंबई : दलित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. परंतु आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.

परंतु या बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दलित संघटनांन मधील आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर तुफान दगडफेक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे. बिहार राज्यात बऱ्याच ठिकाणी रेल रोको करण्यात आल्याचे समजते. मुंबईमध्ये तरी अजून या बंदचा परिणाम झाला असल्याचे समजते.

गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदची माहिती ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही. असा निर्णय येण्याचं मुख्य कारण म्हणजे मोदीसरकारने कोर्टात कमकुवत बाजू मंडळी आणि त्यातूनच हा निर्णय आल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

परंतु केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केले आहे की, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणते पाऊल उचलते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bharat Band(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या