7 July 2020 8:24 PM
अँप डाउनलोड

४ राज्यात भाजपने जनादेशाचा अपमान केला, पण राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही

BJP, Sudhir Mungantiwar

मुंबई: सध्या राज्यातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसत आहे आणि त्यामुळे ते संतापलेले दिसत असून प्रत्येक गोष्टीत जनादेशाचा आदर भाजप करते असे डोस पाजू लागले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील भाजपच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येतं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

शिवसेना-भारतीय जनता पक्षाला जनादेश असल्याने लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, ही भारतीय जनता पक्षाची इच्छा होती. परंतु, मित्र पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर केल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा टोला हाणत भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भारतीय जनता पक्ष-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. असं असून देखील सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनवरून बाहेर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

भारतीय जनता पक्ष जनादेशाचा किती आदर करतं याची उजळणी केल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांच्यासमोर येण्याचं धाडस होणार नाही. अगदी देशभरातील ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे दाखले द्यायचे झाल्यास, गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भारतीय जनता पक्षाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भारतीय जनता पक्षाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भारतीय जनता पक्षाला ५३ जागा, मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ २ तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या,” तरी या राज्यांमध्ये घोडेबाजार करत भाजपने सत्तास्थापन केल्याचा इतिहास आहे. अशा अनेक राज्यांमध्ये जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असताना देखील भारतीय जनता पक्षाने राज्य काबीज केली आणि त्याला अमित शहांची चाणक्यगिरी असं संबोधलं आणि आज हाच पक्ष आणि त्यांचे नेते इतर पक्षांना नैतिकतेचे डोस पाजताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x