1 May 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत भष्टाचार | कोरोना रुग्णाच्या एका बेडसाठी 25 ते 50 हजारांचा भाव, दोघांना अटक

MP Tejaswi Surya

बंगळुरु, ५ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट थांबायचे नावच घेत नाहीये. 3 दिवस नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण मंगळवारी पुन्हा संक्रमितांचा आकडा वाढला. देशभरात मागील 24 तासात 3 लाख 82 हजार 602 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक संक्रमित देश अमेरिकेत आढळलेल्या नवीन संक्रमितांच्या नऊ पट आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात देशभरात सर्वाधिक 3,783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे, मागील चोवीस तासात 3.37 लाख रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. हा आकडा आतपर्यंतचा सर्वाधिक आहे.

दरम्यान, बंगळुरुच्या दक्षिणमधून भाजपचे खासदार झालेले तेजस्वी सूर्या यांनी कोरोना कालात भारतीय जनता पक्षाची सत्ता सत्ता असलेल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लाच घेऊन कोरोना रुग्णांना बेड दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याबद्दल त्यांनी महानगर पालिकेलाच जबाबदार धरले आहे.

नगरपालिकांचे अधिकारी पैसे घेऊन लोकांना बेड उपलब्ध करत आहेत. सुर्या यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. रोहित आणि नेत्र अशी यांची नावे आहेत. हे दोघे एका बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच घेत होते. पोलिसांनी त्यांच्या खात्यातून 1.05 लाख रुपये जप्त केले आहेत.

सुर्यांनी आरोप केला आहे की, बीबीएमपी अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बेड देण्यात गैरव्यवहार सुरु आहेत. बीबीएमपी साईटवर सर्व बेड फुल असल्याचे दाखवत आहे. मात्र, अनेकजण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होत आहेत. अशामुळे बेड कसे फुल असतील हे समजण्यापलिकडे आहे, असे ते म्हणाले. बीबीएमपी अधिकारी, आरोग्य मित्र आणि बाहेरचे लोक यामध्ये गुंतलेले आहेत. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते. या रुग्णांना याची कल्पनाही नव्हती. असे एकच नाही तर हजारो रुग्णांच्या नावे बेड आरक्षण घोटाळा करण्य़ात आला आहे, असा आरोप सुर्या यांनी केला आहे. खासदार सुर्या यांच्या आरोपांनंतर येडीयुराप्पा सरकारने नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

News English Summary: MP Tejaswi Surya, a BJP MP from south of Bangalore, has made a sensational allegation that Corona patients are being given beds in a BJP-ruled municipal hospital during the Corona era. He has blamed the corporation for not getting beds in the hospital.

News English Title: BJP ruled municipal hospital given beds against money said MP Tejaswi Surya news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या