1 May 2025 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा उल्लेख | पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला इशारा

CM Amarinder Singh, Operation Blue Star, Threat From Pakistan, Resolution To Farmers Agitation

चंदीगड, ०३ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी आंदोलनाशी संबंधित एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राला गंभीर इशारा देण्यात आला आहे. अमरिंदर सिंग यांनी 1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलून शकतो, असं ते बैठकीत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याच्या विधानावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बैठकीत जोर दिला.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी शेतकरी आंदोलनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, असं भगंवत मान म्हाले आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी हेल्प डेस्क सेवा सुरु करायला हवी होती. ती देखील सुरु करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह दिल्लींच्या सीमांवर असायल हवं होतं. भगवंत मान यांनी यावेळी अमरिंदरसिंह यांचं कुटुंब अडचणीत असतं तेव्हा ते गृहमंत्र्यांना पत्र लिहीतात. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते अमित शाह यांना भेटत नाहीत, असं टीकास्त्र भगवंत मान यांनी सोडलेय.

 

News English Summary: Chief Minister Amarinder Singh has expressed concern over the farmers’ agitation in an all-party meeting. Delays in finding a solution to the demands of the farmers’ protesters could push the state towards Operation Blue Star in 1984, he said at the meeting. Chief Minister Capt Amarinder Singh stressed on the need for immediate solution to the demands of the farmers.

News English Title: CM Amarinder Singh talked on operation Blue Star Threat From Pakistan To Call For Early Resolution To Farmers Agitation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या