संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक | सचिन सावंत यांचं टीकास्त्र

मुंबई, ०५ जून | देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू झाला असून आजही प्रतिदिन ३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय. त्यात भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यातील भीषण वास्तव समोर आल्याने जगभरातून मोदी सरकारवर टीका झाली आहे. मात्र यामध्ये मोदी आणि गंगा नदीवरील कोरोना मृतांच्या तांडवामुळे भाजपच्या हिंदुत्वाची देखील पोलखोल झाली आहे. परिणामी भाजप सहित आरएसएसची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तत्पूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव, या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता ढासळत असल्याचं बोललं जात आहे. अशावेळी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या, पर्यायानं मोदींच्या मदतीला धावून आला आहे आणि बैठकांवर बैठका होत आहेत. दरम्यान, संघाच्या या सक्रियपणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी संघाच्या या चिंतन शिबिरावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवलाय. मोदींची लोकप्रियता ढासळत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघाकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात सरसंघचालक मोहन भागवत, नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भैय्याजी जोशी. तसंच भारतीय जनता पक्षाचे महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासह संघाचे मोठे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले. संघाच्या या चिंतन शिबिरावरुन सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केलीय.
संघाच्या मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेवरील चिंतन बैठकीतून या गोष्टी स्पष्ट- १. संघ ही सांस्कृतिक संघटना नसून राजकीय संघटना २. संघाचा बोगस राष्ट्रवाद- मोदींना सत्तेसाठी जनता मरते का जगते याची चिंता नाही याचप्रमाणे संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता आहे’, अशा शब्दात सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवलाय.
संघाच्या मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेवरील चिंतन बैठकीतून या गोष्टी स्पष्ट-
१. संघ ही सांस्कृतिक संघटना नसून राजकीय संघटना
२. संघाचा बोगस राष्ट्रवाद-
मोदींना सत्तेसाठी जनता मरते का जगते याची चिंता नाही याचप्रमाणे संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता आहे pic.twitter.com/BqFCr7jGUk— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 5, 2021
News English Summary: Modi’s popularity is said to be declining in the wake of the BJP’s crushing defeat in the West Bengal Assembly elections. In such a situation, once again, the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has come to the aid of the BJP, Modi by choice, and meetings are being held. Meanwhile, Congress spokesperson Sachin Sawant has strongly criticized the RSS’s activism.
News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized RSS stand during corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL