2 May 2025 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी

Corona virus, 2550 Foreign Tablighi Jamaat, Members Blacklisted

नवी दिल्ली, ४ जून: दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. या सर्वांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते. या मुळे सरकारने या सर्वांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीतही टाकले होते. या आरोपींवर महामारी अधिनियम तोडल्याच्या आरोपासह इतर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

ज्यांना काळ्या यादीत टाकले आहेत ते आता पुन्हा भारतात येऊ शकणार नाहीत. पोलिसांनी याआधी कारवाई करण्यात आल्यानंतर माहिती देताना एकूण २८१ परदेशी नागरिक हे निझामुद्दीन परिसरात दोन दिवस उपस्थित होते अशी माहिती दिली होती. त्यात नेपाळ १९, मलेशिया २०, अफगाणिस्तान १, म्यानमार ३३, अल्जेरिया १, दिजबौती १, किर्गिझस्तान २८, इंडोनेशिया ७२, थायलंड ७, श्रीलंका ७२, बांगलादेश १९, इंग्लंड ३, सिंगापूर १, फिजी ४, फ्रान्स १, कुवेत १ या प्रमाणे नागरिक उपस्थित होते. हे सर्व परदेशी लोक पर्यटक व्हिसावर आले व धार्मिक कार्यक्रमात सामील झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले २२०० परदेशी जमातींमध्ये माली, नायजेरिया, श्रीलंका, केनिया, जिबूती, टांझानिया, दक्षिण, आफ्रिका, म्यानमार, थायलंड, बांगलादेश, यूके (OCI कार्ड धारक) ऑस्ट्रेलिया आणि नेपाळमधील नागरिकांचा समावेश आहे. यांना आता पुढील १० वर्षांपर्यंत भारतात येता येणार नाही.

 

News English Summary: A total of 2,550 foreign members of the Tablighi community in Delhi’s Nizamuddin area have been blacklisted. All of them have been banned from entering India for 10 years. The Union Home Ministry has taken this decision.

News English Title: Corona virus 2550 Foreign Tablighi Jamaat Members Blacklisted News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या