तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार; विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडले

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला २०१७ मध्ये तब्बल ५५ वर्षे झाली आणि तर आज पवार ८०च्या वयात देखील तरुण राजकारण्यांना देखील लाज वाटेल अशी पक्ष वाढीसाठीची मेहनत करताना दिसतात. १९९२मध्ये शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते. आता दिल्लीतच राहायचं या विचारानं पवार कामाला लागले होते.
त्यावेळी देखील शरद पवार हे काँग्रेसमध्ये वजनदार आणि प्रभावी नेते होते. मात्र, राजकीय प्रवासात त्यांनी दोन चुका केल्या. एक म्हणजे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि दुसरी चूक म्हणजे १९९२-९३मध्ये देशाचे संरक्षण मंत्री असताना ते संरक्षण मंत्रीपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात परतले. पवारांच्या या दोन चुकांमुळेच ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असं मत काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते पतंगराव कदम यांनी त्यावेळी एका कार्यक्रमात काढले होते.
१९९२मध्ये शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री असताना, त्याच काळात देशाला हादरवणारी एक घटना घडली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशासह मुंबईत मोठी दंगल उसळल्या होत्या. त्यावेळी प्रचंड हिंसाचार सुरू होता. मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वानं शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवलं. १९९३ मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली. मुख्यमंत्री होऊन पाच दिवस होत नाही, तोच १२ डिसेंबर १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर अनेकदा मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री अशी महत्वाची पद त्यांनी भूषवली आणि त्यात उल्लेखनीय कार्य देखील सिद्ध केलं.
आज मोदींच्या काळात समाज माध्यमं आणि त्यावर देशभरातील तरुण मोठ्या संख्येने असल्याने मोदी म्हणजे भारतीय लष्करासाठी झटणारे राजकीय व्यक्तिमत्व अशी प्रतिमा याच समाज माध्यमांचा उपयोग करून बनविण्यात आली आणि पवारांच्या देशकार्याच्या कार्यकाळात जन्मालाच न आलेल्या पिढीच्या विचारांमध्ये शरद पवारांसारखे प्रघल्भ आणि संयमी नेते एखाद्या खलनायकासारखे चुकीच्या पद्धतीने मांडले तरुण पिढीसमोर उभे केले गेले आणि आजही ते प्रकार थांबलेले नाहीत. मोदींनी काश्मीरमध्ये लष्कराच्या छावण्यांना भेटी देत भरपूर फोटोसेशन केलं त्या फोटोंमार्फत मार्केटिंग करत स्वतःची प्रतिमा उंचावून, अघोषीतपणे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली हे वास्तव आहे.
मात्र शरद पवार खूप कमी काळ संरक्षण मंत्री असताना देखील त्यांनी काश्मीरमधील लष्कराच्या छावण्यांना भेटी दिल्या होत्या. मात्र त्यावेळी जन्म न झालेल्या पिढीला ते माहीतच नाही आणि त्यावेळी समाज माध्यमं नसल्याने त्याचा प्रचार देखील होतं नसे. विशेष म्हणजे शरद पवार असू देत किंवा पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पाकिस्तानसोबत दोन युद्ध लढून त्यांनी पाकिस्तानला पाणी पाजून देखील कधी लष्कराचा उपयोग निवडणुका जिंकण्यासाठी केला नाही हे समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला माहीतच नसल्याने विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्याचा फायदा घेत स्वतःचे “आयटी सेल” उभारून देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र आखलं गेलं आणि त्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील झाले. अगदी सध्याच्या तरुणांना शरद पवार यांनी देखील भारतीय लष्कराच्या छावण्यांना भेटी दिल्या होत्या हे पुराव्यानिशी सांगितलं तरी मान्य होणार नाही असंच त्यांचं काहीसं ब्रेनवॉश करण्यात आलं आहे.
विद्यमान मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईकचा असा काही गवगवा केला की त्यावर त्यांनी लोकसभा निवडणुका जिंकल्या. त्यामुळेच संरक्षण मंत्रिपद भूषविलेल्या शरद पवारांनी देखील अनेक खुलासे केले होते. मोदी सरकारवर कटाक्ष टाकत पवार म्हणाले की, माझे संरक्षणमंत्री असताना सैन्याने चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केला, पण त्या यशाला मोदी सरकारने जसा स्वतःचा राजकीय फायदा जोडला, तसे प्रकार आम्ही केले नाही असं ते म्हणाले. कारण सरकारने अशा लष्करी कारवाया सार्वजनिक करायच्या नसतात असं ते म्हणाले होते.
त्यामुळे भविष्यात तरी नव्या पिढीने समाज माध्यमांच्या मार्फत लादलं गेलेलं राजकरण, वास्तव न समाजात त्यामागील खरा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा देशात राजकीय अराजक काही थांबणार नाही अशी परिस्थिती कायम राहील जे देशासाठी आणि तरुणांच्या हिताचं नाही, असं राजकीय जाणकार मानतात.
Web Title: Former Defence Minister Sharad Pawar never made political use of Indian Army.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH