15 August 2022 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

झारखंड निवडणूक: मी व्यापारी आहे, मला गणित चांगलं येतं: अमित शहा

Union Minister Amit Shah, Jharkhand Election

रांची: मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी आपल्या भाषणामधून नाराजी व्यक्त केली. (Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Rally for Jharkhand Assembly Election 2019)

“हे बघा, १०-१५ हजार लोकांची गर्दी केली तर आपण जिंकू का? जिंकू का? नाही… नाही जिंकणार आपण. मला गणित येतं. मी स्वत: एक व्यापारी आहे. मला फसवणं शक्य नाही. एक गोष्ट सांगितली तर करणा का? मोदींना तुम्ही आशिर्वाद देणार का? पुन्हा रघुवर सरकार सत्तेत आणणार का? रघुवर यांनी फोन दिले आहेत ते बाहेर काढा आणि आश्वासन द्या की २५-२५ लोकांना तुम्ही फोन कराल. मामाला, मामीला, काकाला, आत्याला, आजी, आजोबांना, भावांना एकूण 25 फोन करायचे आहेत. फोन करुन समोरच्या व्यक्तीला कमळासमोरचे बटण दाबायला सांगा,” असं शाह आपल्या भाषणामध्ये म्हणाले. (I know Maths because I am Businessman says Union Home Minister Amit Shah )

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एवढं काही बोलून ठेवलं आहे की ते त्यांना देखील आठवत नसावं. महाराष्ट्रात सहानुभूती मिळावी म्हणून एका मंचावर ‘मी शरद पवारांचं बोट धरून राजकरण शिकलो’ असं म्हणाले होते. वास्तविक त्यावर स्वतः शरद पवारांनी देखील मोदींची फिरकी घेतली होती आणि माणूस बोलण्यात ‘लय हुशार’ अशी खेड्यातल्या शैलीत त्यांचा समाचार दुसऱ्या एका कार्यक्रमात घेतला होता.

मात्र, ज्या राज्यात निवडणुका लागतात तिकडच्या मोठ्या स्थानिक नेत्यांची बोटं पकडून मोदी राजकारण शिकत हे आता हास्यास्पद होत चाललं आहे. कारण आता झारखंड’मध्ये विधानसभा निवडणुका लागल्याने मोदींनी प्रचारात तिथल्या नेत्याचं बोट पकडलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी खुंटी येथे पक्षाचे उमेदवार नीलकंठसिंग मुंडा यांच्या बाजूने जाहीर सभेत बोलत आहेत. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्याचे रघुवर दास सरकारच्या विकासातील कामगिरीचा पाढा मांडत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस आणि झामुमोवर जोरदार हल्ला चढविला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचो, तेव्हा मी करिया मुंडा’जी यांचे बोट धरून राजकारण शिकलो. करिया मुंडाबरोबर मला गाव पाहण्याची दृष्टी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झारखंडच्या विकासासाठी काम करीत आहेत. पुढे मोदी म्हणाले की, मी बिरसा मुंडाच्या भूमीवर आलो आहे. टीना भगत कुटुंबातील लोक आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांना दुर्गम खेड्यात नेण्याचे काम टीना भगत कुटुंब करीत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x