जम्मू – काश्मीर : पाकिस्तानने पुन्हां शस्त्रसंधीचं उलंघन करत जम्मू आणि काश्मीरच्या पूँछमध्ये केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे वीरपुत्र किरण थोरात शहीद झाले आहेत. शहिद किरण थोरात हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे रहिवासी आहेत. शहीद किरण थोरात यांचे कुटुंब फकिरबादवाडी मध्ये राहतात. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने कशी कृत्य केली जात आहेत. पाकिस्तानने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भारतीय लष्कराचे जवान किरण थोरात शहीद झाले आहेत. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे जवान शुभम मुस्तापूरे हे पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले होते आणि त्यानंतर लगेचच ही दुसरी दुःखद घटना घडली आहे.
