6 May 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

पाकिस्तानी सत्ताधारी व सैन्य त्यांच्याच जनतेला धोका देतात, हे मी बोललो; मोदी त्याला त्यांची स्तुती समजतात?

Sharad Pawar, PN Narendra Modi

औरंगाबाद : पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.

५२ वर्षे संसदीय राजकारणात असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी माहिती न घेता बोलणे बरे नव्हे. मी संरक्षणमंत्री होतो, पाकिस्तान आणि चीन काय आहेत, हे मला माहिती आहे. मलाही बोलता येईल. पण पंतप्रधानपदाची मला अप्रतिष्ठा करायची नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

सीमेवर पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात केवळ निरोपावर आयोजित केलेल्या दौऱ्याला युवकांमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. त्याचा लाभ राज्यकर्त्यांना झाला. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचा संदेश जनतेत पोहोचवला.

मी देशाच्या संरक्षण विभागाचा कारभार बघिलेला आहे, त्यामुळे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओळखीचे आहेत. या लष्करी अधिकाऱ्यांना ‘पुलवामा’ घडला की घडवला याबद्दल शंका आहे; पण मी हा देशाचा विषय आहे म्हणून त्यावर बोलू नका, असे स्पष्टपणे सांगितले. पुलवामा घडण्यापूर्वी सत्ताधारी जाणार अशीच स्थिती होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखी घटना घडली नाही, तर सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x