6 August 2020 4:24 AM
अँप डाउनलोड

पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या सूचनेवरुन जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्या?

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील ३ पोलिसांच्या क्रूर हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या आदेशावरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील ३ विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुराव्यानिशी उघड झालं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्याआधारेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. परंतु जम्मू-काश्मीरमधील ३ पोलिसांच्या क्रूर हत्येनंतर जे सबळ पुरावे समोर आले, त्यानंतर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली. स्थानिक पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानातूनच देण्यात आल्याचा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianArmy(29)BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x