12 August 2020 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कर्नाटक: कुमारस्वामी सरकारला सायंकाळी ६ पर्यंतची अंतिम मुदत

Karnataka, Kumarswamy

बंगळुरू : कर्नाटकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभेत कालपासून सुरू असलेले राजकीयनाटक आज देखील पाहिल्याप्रमाणेच सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर बहूनत सिद्ध करण्याचा दबाव आणखी वाढला असून थोड्या वेळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. कारण आज सायंकाळी ६ वाजेर्यंतची त्यांना मुदत देण्यात आली आहे. या अगोदर त्यांना आज दुपारी १:३० वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानुसार कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी पुन्हा एकदा बहूमत सिद्ध करण्याची वेळ निश्चित केली आहे. राज्यापालांनी फ्लोर टेस्टसाठीच्या वेळेची निश्चिती करत सांगितले की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सायंकाळी ६ वाजेच्या अगोदर बहूमत सिद्ध करावे लागणार आहे. पहिल्यांदा गुरूवारीच बहूमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होता. मात्र त्यानंतर देखील शुक्रवीर दीड वाजेची वेळ दिल्या गेली, परंतु तेव्हा देखील कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले होते. सदर घडामोडींवर भारतीय जनता पक्षातील दिल्लीश्वरांचे देखील लक्ष असल्याचे समजते. त्यामुळे आता सायंकाळी ६ पर्यंत बहुमत सिद्ध होणार की नाही? याकडे सर्वांचे राजकीय पंडितांचं लक्ष आहे.

विशेष म्हणजे बहुमत सिद्ध करण्यास एवढा कमी कालवधी असून देखील सत्ताधारी युती सरकारने राज्यपालांच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण केला होता. याबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत सांगितले की, राज्यपाल अशा प्रकारे विधीमंडळ लोकपालच्या भूमिकेत काम करू शकत नाहीत. तसेच ते म्हणाले की, मी राज्यपालांचा अपमान करत नाही आणि विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांना विनंती करतो की, राज्यापालांना यासाठी कालमर्यादा ठरवण्याचे अधिकार आहे की नाही, हे निश्चित करावे . यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यपाल परत जा, अशी घोषणाबाजी सुरू केली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x