6 May 2025 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | 50 टक्के परतावा मिळेल, 99 रुपयांचा शेअर खरेदी करून होल्ड करा - NSE: NTPCGREEN Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

चौकीदार भाजप नेते व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त

Arunachal Pradesh, Congress, BJP, Loksabha Election 2019

इटानगर : अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा गंभीर आरोप कांग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेत भाजपावर हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ देखील यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष हे पैसे मतं विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.

अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल का केला नाही? असाही पश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर एकूण ३ जणांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती. निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेसै जप्त करण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या