12 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

बिहारमधील मोदींच्या सभेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एकमेकांना खुर्चा फेकून मारल्या

Narendra Modi, BJP

गया : काल बिहारमधील गया येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. परंतु, मोदींच्या भाषणादरम्यानच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांचे दोन गट आपसात भिडले आणि मोठी धांदल उडाली होती. भाजप कार्यकर्ते वरिष्ठ नेत्याचं ऐकण्याच्या देखील मनस्थितीत दिसत नव्हते. नेत्यांनी आवाहन करून देखील हाणामारी सुरूच होती.

काही क्षणातच कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारण्यास सुरवात केली आणि त्यानंतर मोठी तारांबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वर्धा येथे मोदींची जाहीर सभा पार पडली आणि त्याला देखील लोकांनी पाठ दाखवली होती. तसेच मोदी भाषणाला उभे राहताच लोकांनी सभा स्थळावरून काढता पाय घेतला होता.

त्यामुळे मोदींच्या देशभर होणाऱ्या सभांमध्ये काही ना काही शुक्लकाष्ट लागल्याचे चित्र सध्या आहे. पहिल्यांदा सामान्य लोकं मोदींच्या भाषणाकडे पाठ करत, पण आता उपस्थित कार्यकर्ते देखील त्याच्या उपस्थितीतच हाणामाऱ्या करताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x