29 April 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

चौकीदार भाजप नेते व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त

Arunachal Pradesh, Congress, BJP, Loksabha Election 2019

इटानगर : अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा गंभीर आरोप कांग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेत भाजपावर हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ देखील यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष हे पैसे मतं विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.

अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल का केला नाही? असाही पश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर एकूण ३ जणांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती. निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेसै जप्त करण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x