3 May 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Fact Check: ती चिमुकली शहीद कर्नल संतोष बाबू यांची मुलगी नव्हे, अभाविप’च्या कार्यकर्त्याची बहीण

Martyred Santosh Babu, daughter, ABVP, fact check

मुंबई, २२ जून : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचादेखील समावेश होता. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही शहीद कर्नल बाबू यांचीच मुलगी आहे. फॅक्ट चेकमध्ये याची पडताळणी केली असता, हा दावा खोटा असल्याच समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

सदरील फोटो शेयर करून म्हटले की, “चीनच्या गोळीबारात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या घरी श्रद्धांजली वाहताना त्यांची मुलगी”

तथ्य पडताळणी;
सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेयर करण्यत आला होता. ट्विटमधील माहितीनुसार, कर्नाटकमधील नेलामंगला तालुक्यातील ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याने आपल्या लहान बहिणीसह शहीद कर्नल संतोष बाबू यांना श्रद्धांजली वाहिली होते. हे त्यावेळचे फोटो आहेत.

सोशल मीडियावर या लहान मुलीचा फोटो संतोष बाबू यांची मुलगी म्हणून शेयर होऊ लागल्यानंतर ‘अभाविप’ कर्नाटकच्या ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला. त्यात स्पष्ट म्हटले की, या मुलीचा फोटो काही लोक कर्नल संतोष बाबू यांची मुलगी म्हणून शेयर करीत आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ही संतोष बाबू यांची मुलगी नाही. ती ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याची बहिणी आहे. अभाविप’ कर्नाटकने दुसऱ्या ट्विटमध्ये या मुलीचे नाव कु. मनश्री असल्याचे सांगितले.

निष्कर्ष: यावरून स्पष्ट होते की, अभाविपच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या घरात कर्नल संतोष बाबू यांना श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी त्याच्या लहान बहिणीचा काढलेला फोटो व्हायरल झाला आणि अनेकांना गैरसमज झाला की, ती संतोष बाबू यांचीच मुलगी आहे.

 

News English Summary: Twenty Indian soldiers were killed in a clash between Indian and Chinese forces in the Galvan Valley on Monday night. This included Colonel Santosh Babu. On social media, a photo of Santosh Babu paying homage in front of a young girl is being shared, claiming that she is the daughter of the martyred Colonel Babu. When the fact check was verified, it was found to be false.

News English Title: Martyred Santosh Babu daughter fact check was verified it was found to be false News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या