8 May 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NHPC Share Price | तब्बल 42 टक्के परतावा मिळेल, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, किंमत 82 रुपये - NSE: NHPC HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
x

महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार

Election Commission of India, EVM, Ballet Paper

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकांच्या वेळी १२ सप्टेंबर रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागून राहिल्या होत्या. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. नेमकं या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होतील का दिवाळीनंतर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच घोषणा करण्याचं आयोगानं टाळलं होतं. त्यासाठी आजचा दिवस निवडला आहे.

२०१४च्या तुलनेनं यंदा तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अखेर तो क्षण आला आहे. मतदान दिवाळीच्या आधी होणार की नंतर, निवडणूक नेमकी किती टप्प्यांत होणार याबाबत उत्सुकता आहे. या प्रश्नांची उत्तरंही आज मिळणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ElectionCommission(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या