12 August 2020 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हालचाली; ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

Narendra Modi, PM Narendra Modi, Prime minister Narendra Modi, Jammu Kashmir

जम्मू : रविवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली असून सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांना आजपासून सुट्टी देण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून राज्यात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काश्मीरमध्ये होणाऱ्या हालचाली आणि रविवारी मध्यरात्री काश्मीरमधील नेते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलं आहे. तर रात्री उशीरा राज्यपालांनी डीजीपी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे. डोवाल यांना पत्रकारांनी काश्मीर प्रश्नावर विचारताच त्यांनी हसत हसत निघून गेले.

काश्मीरमध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची रविवारी संध्याकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीला मेहबुबा मुफ्ती आणि शाह फैजल हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीनंतर काही वेळातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि फारुक अब्दुल्लांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला स्थानबद्ध केल्याचा दावा केला. तसेच मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार असल्याची भीतीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली. लवकरच इंटरनेट सेवा खंडित होणार असल्याचं समजतं आहे. काय होणार आहे, अल्लाह जाणे. एक मोठी रात्र सुरू होत आहे. या कठीण काळात आपण सोबत राहायला हवं आणि जे होईल त्याचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असं मुफ्तींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं. मुफ्तींचं हे ट्विट ओमर अब्दुल्लांनी रिट्विट केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Kashmir(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x