महत्वाच्या बातम्या
-
दुर्दैवी! कंपनीत नोकरकपातीच्या धास्तीने सॉफ्टवेअर इंजीनिअर मुलीची आत्महत्या
देशभरात कर्जबाजारीपणामुळे तसेच इतर नैसर्गिक आपतींमुळे देशोधडीला लागलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतं. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याची आकडेवारी अनेकदा वेगवेगळ्या अहवालात समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापनासंदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची निर्णायक बैठक
एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असून राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची मोदींसोबत तब्बल पाऊण तास चर्चा
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरु होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली.
6 वर्षांपूर्वी -
मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस
मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूच्या निवडणुकीत सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन एकत्र येण्याची शक्यता
२०२१ मध्ये तामिळनाडू मध्ये विधानसभा होणार असल्याने सध्या राज्यात निरनिराळ्या आघाड्यांची चर्चा रंगली आहे. त्यातच तब्बल ४० वर्षाची मैत्री असणारे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन (South Super Star Rajinikanth and Kamal Haasan) राजकारणात आले असून तीच मैत्री राजकारणात देखील प्रत्यक्ष पाहायला मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष देखील दक्षिणेत प्रवेशाचे जोरदार प्रयत्न करत असून, त्यानिमित्ताने मध्यंतरी रजनीकांत यांना जवळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसला.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधींचा होकार जवळपास निश्चित असल्याचं वृत्त
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानातील पालिका निवडणुकीत २३ ठिकाणी काँग्रेसची सत्ता; भाजपचा सुपडा साफ
दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले आहेत: जीवीएल नरसिम्हा राव
भारतीय जनता पक्षाकडून कडक शब्दांत शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे आणि त्याचे पडसाद थेट दिल्लीतून उमटले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेवरुन भारतीय जनता पक्षावर करण्यात आलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव (BJP National Spoke person GVL Narasimha Rao) यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल चर्चा नाही; आघाडीच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेते आहोत
सरकार स्थापनेचं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-एनसीपी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतची स्पष्टता अजून आहे.
6 वर्षांपूर्वी -
६ वर्ष भ्रष्टवादी संबोधलं; मोदींसाठी राष्ट्रवादी अचानक सद्गुणी; पवारांनी चाणक्यचा अर्थ शिकवला?
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षानं (Bharatiya Janata Party) देखील शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
एकाच प्रश्नाने कंटाळलेले पवार म्हणाले, 'सेनेसोबत सरकार बनवणार का ते सेनेलाच विचारा'
राज्यातील सत्तास्थापन करण्याबद्दल मुंबई अनेक बैठक झाल्या असल्या तरी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चार वाजता बैठक होणार आहे. त्याआधीच शरद पवार यांनी सत्तास्थापन करण्यावरून सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारी गुगली टाकली आहे. “सत्तास्थापनेबद्दल शिवसेना-भारतीय जनता पक्षानं बघावं,” असं पवार यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर
येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी आपाला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच वाढल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी ‘येत्या २४ नोव्हेंबर रोजी सर्व काही नियोजन व्यवस्थित झाल्यास मी स्वत: अयोध्येला जाईन’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली
देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीवरून सेनेचे खासदार केंद्राला जाब विचारणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरुवात होत असून यामध्ये बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयक मंजूर करून घेणे; तसेच कॉर्पोरेट कर कमी केल्याचा वटहुकूम आणि ई-सिगारेटवर बंदी घातल्याच्या वटहुकमाला कायद्याचे रूप या अधिवेशनात सरकारकडून दिले जाण्याचीही शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सांगता १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
युती तुटली! शिवसेना ‘एनडीए’बाहेर; भाजपाकडून अधिकृत घोषणा
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
कॉपी-पेस्ट याचिका! ईडीने देशातील नागरिकांना या पद्धतीची वागणूक देणे योग्य नव्हे: सुप्रीम कोर्ट
मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. यादरम्यान शुक्रवारी ईडीनं सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून शिवकुमार यांच्या जामिनाला विरोध केला. परंतु यादरम्यान ईडीनं एक मोठी चुक केली. ईडीनं या प्रकरणी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या प्रकरणात दाखल केलेली याचिकाच कॉपी पेस्ट केली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं या मुद्द्यावर लक्ष गेल्यानंतर त्यांनी ईडीची ही याचिका फेटाळून लावली.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO- भाजपकडून राज्यात शेतकऱ्यांसाठी कळवळा तर यूपीत शेतकऱ्यांवर तुफान लाठीचार्ज
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आरपारची लढाई! शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसणार? सविस्तर वृत्त
सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतले आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; एनडीए'तुन बाहेर पडल्यात जमा?
भारतीय जनता पक्षाला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे नेते आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेणार आहेत. याशिवाय, सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आज अनेक बैठका अपेक्षित आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH