महत्वाच्या बातम्या
-
नोटबंदी फसल्याचा पुरावा? भाजपकडून ८ नोव्हेंबरला ना 'पत्रकार परिषद' ना 'मन कि बात'?
देशातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर पत्रकार परिषद आयोजित करणारा भाजप पक्ष आणि ‘मन की बात’ मध्ये मनातल्या गोष्टी देशवासियांना सांगणारे नरेंद्र मोदी, यापैकी ८ नोव्हेंबरला ना पक्षाने एखादी पत्रकार परिषद आयोजित केली, ना मोदींनी २ वर्षांपूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयावर ‘मन मोकळं केलं’. यावरूनच नोटबंदी फसल्याचे जवळपास निश्चित होते.
7 वर्षांपूर्वी -
आज किंवा उद्या गोव्यात नेतृत्वबदल गरजेचा : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यात नेतृत्वबदलाबाबत भाष्य करुन भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणले आहे. दरम्यान, गोव्यात भाजप नेतृत्व बदल करणार नाही, असे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आधीच स्पष्ट केले होते. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आजाराने ग्रासले आहे. परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा ते राज्याचं काम करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
हिंदूंनो! पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून सावधान: शिवसेना
जसजशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे, तसा राम मंदिराचा विषय अधिक गडद करण्याचा प्रयत्नं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात श्री. रामचा भव्य पुतळा उभारण्याचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच मित्र पक्ष शिवसेनेने सामना या मुखपत्रातून मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
RBI आणि केंद्रातील वाद विकोपाला? आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकची तयारी?
भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रातील मोदी सरकारमधील वाद विकोपाला गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आरबीआयच्या संचालक मंडळाच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या मुंबईतील बैठकीत उर्जित पटेल यांनी काही आकस्मित निर्णय घेतल्यास साऊथ ब्लॉकने तयारी सुरु केली असून त्यांच्याजागी हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमित शहांना मुस्लिम मुक्त देश हवा, ओवेसीचं वक्तव्य
तेलंगनात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यरोपांच्या मलिका सुरु झाल्या आहेत। त्यामुळे आजच्या सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की , “भाजपला एमआयएम मुक्त नाही तर मुस्लिम मुक्त देश हवा आहे. त्यामुळे भाजपला काही करून तेलंगणात विजय मिळवायचाच आहे, असं ओवेसी म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
पुतळ्यासाठी पैसे आहेत, मग नक्कीच भारताला आपण पैसे द्यायला नको: पीटर बोन
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८५ मीटर उंचीच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, जगातला सर्वांत उंच पुतळा बांधल्याबद्दल एकीकडे मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर विरोधक या पुतळ्यावर ३ हजार कोटी खर्च केल्याबद्दल मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. परंतु, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा या स्मारकावर टीका होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदीनंतर काळ्या पैशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले: सर्व्हेक्षण
आज ८ नोव्हेंबर २०१८ या दिवशी नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरवून एकूण चलनातील ८६ टक्के चलन बंद करीत असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यावेळी वाढत्या काळ्या पैशाला म्हणजे ‘ब्लॅक मनी’ला आळा घालण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे मोदींनी देशातील जनतेला सांगितले होते. परंतु, मोदींचा तो ‘ब्लॅक मनी’ संपविण्याचा दावा अखेर एका सर्वेक्षणातून खोटा ठरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूत पोटनिवडणुकीच्या सर्व २० जागा लढणार: कमल हसन
प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त महत्वाची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व म्हणजे २० जागा त्यांचा पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा केली. त्यानिमित्त पक्षाने वीस विधानसभा मतदारसंघात ८०% कार्यकर्ते नियुक्त केल्याचे म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींच्या या दोन कंपन्यांच्या खात्यात १९.३४ कोटीच शिल्लक, विरोधकांचा दावा खरा ठरतो आहे?
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या देशभर राफेल घोटाळ्यातील आरोपांमुळे चर्चेत आले असताना, विरोधकांनी सुद्धा त्यांच्या कंपन्या प्रचंड कर्जात असल्यामुळे मोदी त्यांना मदत करत असल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांना अप्रत्यक्षरित्या दुजोरा मिळत आहे. कारण रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या एकूण १४४ बँक खात्यात आता १९.३४ कोटी रुपये इतकी रक्कमच शिल्लक असल्याची माहितीसमोर येत आहे. कारण एका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
महागाईने सामान्य भिकेला लागला, तर सत्ताकाळात भाजप सर्वात धनाढ्य पक्ष झाला
सबका साथ सबका विकास अशी घोषणा देत सत्तेवर विराजमान झालेला भारतीय जनता पक्ष सामन्यांना महागाईने भिकेला लावून स्वतः सर्वात धनाढ्य पक्ष बनला आहे. देशातील अनेक कंपन्यांनी आणि कॉर्पोरेट हाऊसेसने देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी तब्बल ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीत जमा केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
PNB महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला अटक
PNB महाघोटाळा १४,००० कोटीच्या घरात असून सरकारवर या विषयावरून खूप टीका होत आहे. दरम्यान, याच कर्ज घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करून ताब्यात घेण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भर दिवाळीत भाजपवर 'राज'कीय फटाके, भाजप IT सेल चवताळण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केलं असून त्यांना नरकासुर असं म्हटलं आहे. व्यंगचित्रात अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘राफेल डील’ प्रकरणी CBI ठाम राहिल्यास चित्र बदलेल
फ्रेंच बनावटीची राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी संदर्भात CBI यंत्रणा ठाम राहिल्यास देशातील चित्र नक्कीच बदलेल, असं दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री अमी कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सध्या एकूणच हालचालीवरून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, आगामी लोकसभा निवडणुकात बदल न झाल्यास भारतात हुकूमशाही अंमलात आली तर त्यात नवल वाटणार नसल्याची टीका चव्हाण यांनी भाषणादरम्यान केली.
7 वर्षांपूर्वी -
भाजपा कार्यकर्त्यांकडून मला गँगरेपची धमकी: दिया शेटक
गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते सुभाष शिरोडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मला थेट गँगरेपची धमकी दिल्याचा खळबळ जनक आरोप दिव्या शेटकर यांनी केल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
वनविभाग अव्नीचे शत्रू नाही: सुधीर मुनगंटीवार
रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अव्नी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्याबद्दल एकावर एक ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, आम्ही अव्नी वाघिणीला नाईलाजाने मारल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे मनेका गांधी यांना अजून सविस्तर माहिती माहित नाही असं वनमंत्री म्हणाले. दरम्यान, वाघिणीला मारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच वाघिण काय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती, असं सुद्धा म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
देश ‘आयसीयू’त, पण निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्ज बुडव्यांची नावे जाहीर करण्यासाठी RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा कर्ज थकवणाऱ्यांची नावे जाहीर केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाने RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. तसेच ‘बुडीत कर्ज’ प्रकरणी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी लिहीलेल्या पत्राला सामान्यांसाठी सार्वजनिक करण्याचे लेखी निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने पीएमओ, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि आरबीआय’ला दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बाबूभय्या ये क्या बोला रे बाबा तुने? मोदींचा 'तो' दावा अप्रत्यक्ष फोल ठरवला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेसने ६०-७० वर्षात देशात काहीच केलं नाही असा दावा करत असतात. त्यात दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये तब्बल ३,००० कोटीच्या आसपास पैसा खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभ्या केल्याने अनेकांनी टीका सुद्धा केली. परंतु भाजपचे खासदार परेश रावल याच पुतळ्याच्या राजकारणावरून टीकाकारांना ट्विट करून उत्तर द्यायला गेले आणि अप्रत्यक्ष रित्या मोदींनाच तोंडघशी पाडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल - भाजपने १.५ करोडला दिलीप मकवानांना निवडणुकीचं तिकीट विकलं?
व्हिडिओ व्हायरल – भाजपने १.५ करोडला दिलीप मकवानांना निवडणुकीचं तिकीट विकलं?
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS