30 April 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

लॉकडाऊन ४ मध्ये काय आहेत मोदी सरकारच्या योजना? सविस्तर वृत्त

Lockdown, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १२ मे: भारतातील वाढता कोरोनाबाधितांचा आकड्यामुळं सध्या देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन आहे. १७ मेपर्यंत या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय कोरोनाला रोखण्यात असमर्थ असल्याचे मोदींचे मत आहे. त्यामुळं १७ मेनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

लॉकडाऊन ३ मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन ४ मध्ये असणार आहे. यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले.

मोदींच्या या प्लॅननुसार रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मनी कंट्रोलने बिझनेस स्टँडर्डचा हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सरकारी कर्ज आर्थिक वर्ष २०२१साठी ७.८ लाख कोटी रुपयांवरून १२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या सरकार निर्णय घेणार असून, येणाऱ्या पैशांतूनच प्रोत्साहन पॅकेज दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था हळूहळू खुली झाल्यामुळे सरकारला लघु उद्योगांना मदत करण्याची इच्छा आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस येणारं नवं पॅकेज मागील १.७ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा बरेच मोठे असणार आहे.

नोकरदारांसाठी होऊ शकते मोठी घोषणा- रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पुढील नवं पॅकेज देशातील गरीब घटक आणि नोकरी गमावलेल्या लोकांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. छोट्या-मोठ्या कंपन्यांना करमुक्ती व इतर उपाययोजनांद्वारे दिलासा मिळू शकतो असं वृत्त आहे.

 

News English Summary: The country is currently in the third phase of lockdown due to the growing number of corona sufferers in India. The lockdown has been extended to May 17, but Modi said no option other than lockdown would be able to stop Corona. Therefore, the lockdown period can be extended even after May 17.

News English Title: PM Narendra Modi government may implement next plan during lockdown 3 phase News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या