30 April 2025 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

पवारांचं बोट सोडलं? झारखंडमध्ये मोदी म्हणाले 'करिया मुंडांचं बोट धरून राजकारण शिकलो'

PM Narendra Modi, Jharkhand Karia Munda

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एवढं काही बोलून ठेवलं आहे की ते त्यांना देखील आठवत नसावं. महाराष्ट्रात सहानुभूती मिळावी म्हणून एका मंचावर ‘मी शरद पवारांचं बोट धरून राजकरण शिकलो’ असं म्हणाले होते. वास्तविक त्यावर स्वतः शरद पवारांनी देखील मोदींची फिरकी घेतली होती आणि माणूस बोलण्यात ‘लय हुशार’ अशी खेड्यातल्या शैलीत त्यांचा समाचार दुसऱ्या एका कार्यक्रमात घेतला होता.

मात्र, ज्या राज्यात निवडणुका लागतात तिकडच्या मोठ्या स्थानिक नेत्यांची बोटं पकडून मोदी राजकारण शिकत हे आता हास्यास्पद होत चाललं आहे. कारण आता झारखंड’मध्ये विधानसभा निवडणुका लागल्याने मोदींनी प्रचारात तिथल्या नेत्याचं बोट पकडलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी खुंटी येथे पक्षाचे उमेदवार नीलकंठसिंग मुंडा यांच्या बाजूने जाहीर सभेत बोलत आहेत. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्याचे रघुवर दास सरकारच्या विकासातील कामगिरीचा पाढा मांडत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस आणि झामुमोवर जोरदार हल्ला चढविला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचो, तेव्हा मी करिया मुंडा’जी यांचे बोट धरून राजकारण शिकलो. करिया मुंडाबरोबर मला गाव पाहण्याची दृष्टी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झारखंडच्या विकासासाठी काम करीत आहेत. पुढे मोदी म्हणाले की, मी बिरसा मुंडाच्या भूमीवर आलो आहे. टीना भगत कुटुंबातील लोक आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांना दुर्गम खेड्यात नेण्याचे काम टीना भगत कुटुंब करीत आहे.

आम्ही सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मानाचा लाभ करून दिला आहे. छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याचे आश्वासनही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना आजारपणापासून वाचवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आदिवासींच्या मुलांसाठी एकलव्य शाळा सुरू केल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले आहे. काश्मीरला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आदिवासी आयएएस जबाबदार आहेत. पीएम मोदी म्हणाले की, राम मंदिर बरेच दिवस असेच लटकत होते. तेदेखील शांततेत सोडवले गेले आहे. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा भगवान राम यांनी अयोध्या सोडले तेव्हा ते राजकुमार होते. १४ वर्षानंतर जेव्हा ते परत आले, तेव्हा ते एक सन्माननीय व्यक्ती बनले, कारण ते आदिवासींमध्ये १४ वर्षे राहिले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या