राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा होईल, भाजप नेत्याचं वक्तव्य

भोपाळ, २३ जुलै : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात देशात तब्बल ४५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा साडे बारा लाखांच्या जवळ पोहोचला. तर कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातच कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्यानं संकट आणखी गहिरं झालं आहे. कोरोनावरील लस येण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी तयारीही सुरू झाली. राम मंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक वक्तव्य केलं आहे.
‘दानवांचा खात्मा करण्यासाठी आणि माणसांच्या कल्याणासाठी प्रभू रामांनी वेळोवेळी पुनर्जन्म घेतले आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा सुरू होईल,’ असा विश्वास शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. ‘भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. आपण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. याशिवाय आपल्या देवांचंही स्मरण करत आहोत,’ असं ते पुढे म्हणाले.
दाव्याप्रमाणे, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.
News English Summary: Bhumi Pujan will be held on August 5 at the hands of Prime Minister Narendra Modi and preparations have started for it. BJP leader and Madhya Pradesh Assembly Speaker Rameshwar Sharma has made a statement while discussing the construction of the Ram temple.
News English Title: Ram Temple Construction Will Lead To End Of Covid said BJP Leader from Madhya Pradesh News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL