7 December 2021 4:49 AM
अँप डाउनलोड

गायीच्या शेणापासून बनवलेली चीप लॉन्च | मोबाईल राहणार रेडिएशन फ्री

ashtriya Kamdhenu Aayog, chip launched, Cow dung Chip, Mobile radiation free

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर : राष्ट्रीय कामधेनु आयोगाने (Rashtriya Kamdhenu Aayog) यावर्षी दिवाळीमध्ये ‘कामधेनु दिवाळी अभियान’ सरू केलं आहे. या अभियानांतर्गत दिवाळी दरम्यान, गायीच्या शेणापासून बनलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीमध्ये गायीच्या शेणापासून दिवे, मेणबत्ती, धूप, अगरबत्ती, वॉल-पीस, शुभ-लाभ, स्वस्तिक, पेपर-वेट, हवन सामग्री, गणपती आणि लक्ष्मी देवीची मूर्ती बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय कामधेनु आयोगाने गायीच्या शेणापासून बनलेली चीप (Cow Dung Chip) लॉन्च केली आहे. आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या चीपमुळे मोबाईल हँडसेटचं रेडिएशन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. मोबाईलसोबत ही चीप ठेवल्यानंतर रेडिएशन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं, आम्ही पाहिलं, असं आयोगाचे अध्यक्ष वल्लभ भाई कथीरिया यांनी पत्रपरिषदेत सांगितलं. या चीपशिवाय, कामधेनु आयोगाने गायीच्या शेणापासून बनलेल्या इतरही अनेक वस्तू यावेळी लॉन्च केल्या. वल्लभ भाई कथीरिया यांनी यावेळी शेणापासून बनलेले दिवे, शुभ-लाभ आणि चीपही दाखवली. दिवाळीत प्रदूषण कमी करणं, हा यामागचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली.

 

News English Summary: Rashtriya Kamdhenu Aayog (RKA) chairman Vallabhbhai Kathiria on Monday launched a “chip” made of cow dung, claiming that it reduces radiation from mobile phones significantly. “See, this is a radiation chip. You can keep it in your mobile. We have seen that if you keep this chip in your mobile, it reduces radiation significantly. If you want to avoid disease, then this is going to be used,” Kathiria said at the launch of a nationwide campaign ‘Kamdhenu Deepawali Abhiyan’ that aimed at promoting cow dung products.

News English Title: Rashtriya Kamdhenu Aayog chip launched made from cow dung this chip helps to keep mobile radiation free News updates.

हॅशटॅग्स

#india(219)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x