15 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

पवार यूपीएचे चेअरमन होण्याची शक्यता | मोदी-शहांसमोर मोठी चाणक्य नीती?

Sharad Pawar, UPA President, Loksabha election 2024

नवी दिल्ली, १० डिसेंबर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्वीकारणार का, पंतप्रधानपदावर दावेदारी सांगण्याची काँग्रेसची मागणी पवार मान्य करणार का, याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.

“राहुल गांधी हे यूपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल. ते सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत,” असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये युती केली होती. परंतु निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केलं होतं.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कार्यक्षम आहेत. विरोधातील सर्वच पक्षांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांची राजकीय परिपक्वता, मास बेस, सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा पाहता शरद पवार हा योग्य पर्याय ठरेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी 78 वर्षांचे ज्यो बायडेन असतील, तर शरद पवार केंद्रीय पातळीवर नेतृत्वाची धुरा घेऊ शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात महाविकास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.

“आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

“शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. यूपीएचं अध्यक्षपद किंवा विरोधी पक्षांचा नेता कोण होणार, हा सध्या विषय नाही, त्याबाबत सर्व जण मिळून निर्णय घेतील. विधान परिषदेच्या निकालांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राने स्वीकृती दिली आहे. त्यामुळे देशातही हा प्रयोग झाला, तर स्वीकारलं जाईल. जनतेला चांगला पर्याय दिल्यास सत्तांतर निश्चित आहे” असंही नवाब मलिक म्हणाले.

 

News English Summary: Under the leadership of NCP President Sharad Pawar, the Congress has insisted on building alliances with the opposition at the national level. In particular, the Congress is ready to nominate Sharad Pawar as the Prime Ministerial candidate. Therefore, the general public is wondering whether Sharad Pawar will accept the post of UPA president instead of senior Congress leader Sonia Gandhi and whether he will accept the Congress’ demand to contest for the post of Prime Minister.

News English Title: Sharad Pawar might be appointed as UPA President for loksabha election 2024 news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x