9 May 2025 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

शिवसेना खासदार अरविंद सावंत घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

Narendra Modi, Arvind Sawant, Shivsena, BJP, Loksabha Election 2019

मुंबई : काँग्रेसचे देशभर सुपडा साफ करून भाजपने बहुमताने विजय प्राप्त केला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे अधोरेखित झाले. दरम्यान आज राष्ट्रपती भवनात सांयकाळी ७ वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचादेखील समावेश असल्याचे वृत्त आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत भल्या पहाटे आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी ५ तास आणि आज बुधवारी ४ तास मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. गुरुवारी पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. मागील मंत्रिमंडळात शिवसेनेचा केवळ एक मंत्री होता. मात्र यंदा किमान २ मंत्रिपदे शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांची नावे चर्चेत होती.

क्षिण मुंबईमधून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना १,००,०६७ मतांनी पराभूत करून सावंत हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. अरविंद सावंत यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून व संसदेत सर्वात जास्त उपस्थिती असलेले खासदार म्हणून गौरवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांना मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या