27 April 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

दिल्लीत कोरोना कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचा दावा

Delhi Covid 19, community spread

नवी दिल्ली, ९ जून : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कम्युनिटी स्प्रेडची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, ‘एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे, परंतु केवळ केंद्रच त्याची घोषणा करू शकतो.’

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, दिल्लीतील रुग्णालयांबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय एलजी सरकारने रद्दबातल केला आहे, अशा परिस्थितीत आता दिल्लीतील लोकांवर उपचार कोठे होतील. दिल्लीत जगभरातून विमानं येथे आली आहेत. त्यामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. ‘दिल्लीत लोकं बाहेरून आले तर राज्यातील जनतेवर कसे उपचार करणार. केंद्र सरकारने त्यांच्या 10 हजार खाटांवर उपचार करावे. बाहेरुन येणारी विमानं थांबवावी अशी आमची मागणी होती. पण केंद्राने ती मान्य केली नाही.’

‘आम्ही सतत बेड वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत, एम्सच्या संचालकांनी कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचं स्वीकारलं आहे. पण केंद्र सरकार ते स्वीकारत नाही. दिल्लीत अशी बरेच रुग्ण आहेत. ज्यांचा कोणताही स्रोत नाही. हा कम्युनिटी स्प्रेड आहे की नाही हे केंद्राने मान्य केले तेव्हा जाहीर होईल.’ जर कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असं जाहीर करण्यात आलं. तर याचा अर्थ भारत कोरोनाच्या संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात गेला असा होतो.

दरम्यान, दिवसागणिक देशातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९ हजार ९८७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. देश अनलॉक होत असतानाच करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

देशभरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.४९ टक्के आहे. सध्या एक लाख २९ हजार ९१७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: The growing number of corona patients in Delhi has sparked a discussion of community spread. Delhi Health Minister Satyendra Jain on Tuesday said, “AIIMS directors have acknowledged that a community spread of corona virus has started in Delhi, but only the Center can announce it.”

News English Title: Delhi health minister on community spread News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x