6 May 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

अद्यापही कोरोनाची धोका टळलेला नाही, जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडते आहे - WHO

Corona virus, World Health Organisation, WHO

जिनिव्हा, ०९ जून : जगभरात कोरोनाचा प्रसार थांबता थांबत नाही आहे. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. मात्र सर्वांना चिंता होती ती, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने एक चांगली बातमी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. WHOच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅनकर्खोव्ह यांनी सांगितले की, बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. निम्म्याहून अधिक एसिंम्प्टोमॅटिक प्रकरणे नवीन प्रकरणांमध्ये आढळून येत आहेत, परंतु या संक्रमित रुग्णांकडून संसर्ग होण्याची धोका कमी आहे.

WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा असे मानले जाते की अशा संसर्गांमुळे Covid-19 झपाट्यानं पसरत आहे.

दरम्यान, एकीकडे अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात करोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे. आपण यासंबंधी इशारा दिला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. अमेरिकेत सध्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन आंदोलनं सुरु असून जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. AFP ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: On the one hand, while many countries are easing the lockdown, the World Health Organization has said that the situation in the world is deteriorating. He also said that he had given a warning about this. The World Health Organization (WHO) has reported the highest number of coronary heart disease cases on Monday.

News English Title: Corona virus Situation Worsening Worldwide World Health Organisation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x