महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ
नवी दिल्ली, ११ मे: देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट केली होती. यात १३० जिल्हे रेड, २८४ ऑरेंज आणि ३१९ जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारची चिंता आता आणखीच वाढली आहे. कारण ग्रीन झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यान ते रेड झोन होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. राज्यात आतापर्यंत २२ हजार १७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यांपैकी ८३२ रुग्ण मरण पावले आहेत, तर ४,१९९ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९४ लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूम ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आला आहे.
तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आला आहे. या राज्यात आतापर्यंत, ७,२०४ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी एकूण ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या सुमारे ७ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत दिल्लीत ६,९२३ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी एकूण ७३ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. यानंतर राजस्थानमध्ये ३,८१४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राज्यात एकूण १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
News English Summary: After Maharashtra, corona infection is increasing rapidly in Gujarat. So far, 8,194 people have been infected with corona virus in Gujarat. A total of 493 patients have died. Tamil Nadu is ranked third.
News English Title: Story After Maharashtra corona infection is increasing rapidly in Gujarat News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा